एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने मलिक यांना १० नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला.
Court – So you file reply soon.
Ash Shaikh- The effect defamation has had can be seen…..he is referring to some case..I am certainly not Dawood Wankhede.
Damle – He needs to know he is appearing for the father.
Court – file reply tom#BombayHC#NawabMalik#SameerWankhede
— Live Law (@LiveLawIndia) November 8, 2021
Court orders reply to be filed by tomorrow. Next date November 10. #BombayHighCourt#NawabMalik#SameerWankhede
— Live Law (@LiveLawIndia) November 8, 2021
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचे आरोप-प्रत्यारोप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे हिंदू नाहीत, मुस्लिम असल्याचे सांगत थेट त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर आरोप केले. त्यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र प्रसिद्ध केले. आता वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. वानखेडे यांच्या वतीने वकील अर्शद शेख यांनी युक्तीवाद केला, तर मलिक यांच्या वतीने वकील अतुल दामले यांनी युक्तीवाद केला. मलिक यांच्या विरोधात भाजपचे नेते मोहित भारती यांनीही १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला.
(हेही वाचा : ‘त्या’ पार्टीचे अस्लम शेख यांनाही निमंत्रण, तरीही ते गप्प का?)
काय म्हटले आहे वानखेडेंनी त्यांच्या दाव्यात?
- मलिक यांच्या आरोपामुळे कुटुंबाचे आणि वैयक्तीक भरून न येणारे नुकसान झाले आहे.
- मलिक यांना सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे यांवर आमची बदनामी होईल असे वक्तव्य करण्यास कायमस्वरूपी बंदी आणावी
- आमची बदनामी केलेली आतापर्यंतची वक्तव्ये, प्रसिद्धी पत्रके आणि ट्विट डिलीट करण्याचे आदेश द्यावेत
- पत्रकार परिषद आणि सोशल मीडियामधून वक्तव्य करून त्यांनी आमच्या कुटुंबाची मानहानी केली, त्यामुळे मलिक यांनी सव्वा कोटी रुपयांची भरपाई करावी