फडणवीस, दरेकरांनंतर आता बावनकुळेंची ‘या’ प्रकरणी होणार चौकशी

136

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या चौकश्या सातत्याने सुरू असून सध्या राजकीय मंडळींच्या मागे ईडीची पिडा लागल्याचे दिसतेय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्ट महाविकास आघाडी सरकारची पोलखोल केल्याने त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना मुंबई बँक घोटाळा प्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आणि आता माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘या’ प्रकरणी होणार बावनकुळेंची चौकशी

सक्तवसुली संचलनालय, आयकर विभाग, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रकरणात चौकशी करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप विरोधकांवर केला. या छाप्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यातील तपास यंत्रणा भाजपच्या नेत्यांच्या पाठिशी लावल्याचा आरोप विरोधक करत असताना आता बावनकुळे ऊर्जा मंत्री असताना महावितरणकडून करण्यात आलेल्या कामांची चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

(हेही वाचा – Russia-Ukraine War: पहिल्यांदा रशियन सैन्याने भारतीयांच्या सुटकेसाठी केली ‘ही’ मदत)

एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, तत्काळ तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये महावितरणच्या तीन संचालकांना नियुक्त करण्यात आले आहे. महावितरण कंपनीचे वित्त संचालक या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर संचलन विभागाचे संचालक आणि कार्यकारी संचालकांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देखील राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.