आंतरराष्ट्रीय महोत्सवात पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यवसायिक, स्टेक होल्डर्स, मुंबईतील उद्योजक व इतर क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींच्या सहभागामुळे या पर्यटन महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळण्यास मदत होईल. राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, राज्यातील विविध खाद्य संस्कृती, साहसी क्रीडा प्रकार जसे की, सायकलींग टूर, हार्बर टूरीझम,वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज् इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवामध्ये सीटी टूर आयोजकांना एका छत्राखाली आणून शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा थिएटर, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाईडेड सीटी टूर, हेरिटेज वॉक,नेचर वॉक, फोटोग्राफी, योगा कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
Maharashtra Government : उद्योगपती आनंद महिंद्रांच्या माध्यमातून मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन
पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली.
राज्यातील पर्यटनाला चालना देऊन मुंबई शहराला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई शहर व उपनगरातील विविध विभागात मुंबई आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाउंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश स्टेक होल्डर्स सहभागी होणार असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल असे मत पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केले.
हेही पहा –
पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली. यावेळी या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा उपस्थित होत्या. पर्यटन मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी फाउंडेशनची स्थापना करावी अशी विनंती प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली होती. या फाउंडेशनमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी फाउंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील व त्यात स्टेक होल्डर्सचा सहभाग वाढण्यास मदत होईल. हा महोत्सव यापुढे स्वयंपूर्ण लोकसहभागातून आयोजित होत राहील.