राजधानीत ‘माझी माती माझा देश’ अभियानातंर्गत ‘पंचप्रण शपथ’चे आयोजन

महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र मध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली.

640
राजधानीत ‘माझी माती माझा देश’ अभियानातंर्गत ‘पंचप्रण शपथ’चे आयोजन
राजधानीत ‘माझी माती माझा देश’ अभियानातंर्गत ‘पंचप्रण शपथ’चे आयोजन

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान बुधवार, ९ ऑगस्ट पासून सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र मध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांनी ‘भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करु. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करण्याप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु’ ही ‘पंचप्रण शपथ’ उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. महाराष्ट्र परिचय केंद्रात प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ दिली.

(हेही वाचा – Meri Mati-Mera Desh : ‘मेरी माटी-मेरा देश’ अभियान सुरू; भाजप देशसेवा करण्यासाठी बाध्य – पंतप्रधान मोदी)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा बुधवार, ९ ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाची सुरुवात झाली आहे. राज्यात ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत विविध उपक्रम आयोजित केले जातील. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.