पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या खासदार, आमदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात ४१५ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवारी (ता.१७) करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
(हेही वाचा – Forbes Rich List: जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी दुसऱ्या स्थानी)
यानिमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत बूथ स्तरावर जाऊन ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून १७ सप्टेंबर या दिवसापासून उत्सवाला सुरुवात होणार असून २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता होणार आहे. यामध्ये स्वच्छता अभियान, मन की बात कार्यक्रम, महापुरुषांच्या पुतळ्यांची सफाई, बूस्टर डोस, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक नॅचरोपॅथी, मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप, सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, मोफत धान्य वाटप, बुद्धीजीवी संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनानावरील प्रदर्शनी अश्या उपक्रमांचा समावेश आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘विविधतेत एकता’ म्हणून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील जनतेचा प्रधानसेवक म्हणून अहोरात्र अपार मेहनत करुन, काम करण्याचे व्रत आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगीकारले आहे. त्यामुळे आपण ही त्यांचा आदर्श घेऊन जनतेचे सेवक म्हणूनच सतत सातत्याने काम करीत आहोत. याच अनुषंगाने मुंबई भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे .
Join Our WhatsApp Community