- प्रतिनिधी
पूर्व उपनगरातील मानखुर्द-शिवाजी नगर या ठिकाणी असलेले समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) उमेदवार अबू आझमी यांच्या कार्यालयात उघडपणे नशा केली जात असल्याचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ माजी मंत्री नवाब मलिक यांनी स्वतः त्याच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून ट्विट केला आहे. तुमच्या मुलांना सपा (समाजवादी पार्टी) पासून दूर ठेवण्याचे आव्हान नवाब मलिक यांनी केले आहे. या कार्यालयात उघडपणे सात ते आठ जणांचे एक टोळके अमली पदार्थांची नशा करताना व्हिडीओमध्ये आढळून येत आहे, स्थानिक पोलिसांनी अद्याप यांच्यावर अद्याप काहीही दखल घेतली नाही.
मानखुर्द, गोवंडी शिवाजी नगर, बैगनवाडी हा मुस्लिम बहुल विभाग आहे. हा भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री आणि सेवन केले जात आहे. अल्पवयीन मुलांपासून ते महिलांपर्यंत अमली पदार्थांची नशा आणि विक्री करताना आढळून येतात. येथील तरुणपिढी नशेच्या आहारी गेली आहे. हलक्यात हलक्या नशेपासून तर महागड्या नशेपर्यंत सर्व या ठिकाणी उपलब्ध होते. नशेत येथील तरुणांकडून गुन्हे घडत असतात, मद्यापेक्षा या ठिकाणी गांजा, चरस, अफीम, एमडी या अमली पदार्थांच्या विळख्यात येथील तरुणपिढी अडकली आहे. येथील राजकारणी या तरुणांना नशेच्या लाटेत लोटत असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Sikkim मध्ये विरोधी पक्षच संपला; काय घडली घडामोड?)
या नशेबाजामुळे या परिसरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थानिकांना हा प्रकार नवीन नसून वर्षनुवर्षं या ठिकाणी नशाबाजी केली जात आहेत. यात अल्पवयीन मुले देखील नशेच्या लाटेत लोटली जात आहे, बटन (नशेची गोळी), कोडीन कफ सिरप, व्हाईटनर, सोल्युशन या सारखी हलकी आणि स्वस्त नशा करताना येथील अल्पवयीन मुले आढळून येतील. मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अअबू आझमी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक हे आहेत. नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी येथील जनतेला आश्वासन देत मानखुर्द शिवाजी नगर परिसर नशामुक्त करू अशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर नुकताच नवाब मलिक यांनी एक्स या खात्यावर समाजवादी पार्टीचे उमेदवार अबू आझमी यांच्या कार्यालयातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
सावधान!
जनहित में जारी,
अपने बच्चों को सपा से दूर रखें!सपा कार्यालय बना नशे का अड्डा!#MankhurdShivajiNagar#Govandi pic.twitter.com/LAJYWlqfRV
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 31, 2024
या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “सावधान! जनहित में जारी, अपने बच्चों को सपा से दूर रखें! सपा कार्यालय बना नशे का अड्डा!, पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) स्थानिक आमदार अबू आझमी यांचे कार्यालय असून या कार्यालयात एक टोळी एमडी (मेफेड्रोन) या सारख्या अमली पदार्थांची नशा करताना आढळून येत आहे. तसेच एकमेकांशी बोलताना अश्लील भाषेचा वापर केला जात आहे. मलिक यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओमुळे मानखुर्द-शिवाजी नगर मधील नशेचा बाजार समोर आला आहे. हा सर्व प्रकार अबू आझमी यांच्या कार्यालयात सुरू असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओ संदर्भात स्थानिक पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांना हे ट्विट व्हॉट्सॲपवर पाठवून कारवाई संदर्भात विचारले असता चेक करून कळवतो असे ढवळे यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community