आशिष शेलारांना धमकी देणारा निघाला ‘ओसामा’

भाजपचे नेते आशिष शेलार यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओसामा समशेर खान (४८) आहे.

दोन मोबाईल क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी

भाजपचे आमदार आशिष शेलार यांना फोनवर धमकी देणाऱ्या एकाला गुन्हे शाखा वांदे युनिट-९ च्या अधिकाऱ्यांनी केली अटक ओसामा समशेर खान (४८) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. माहीम कॉजवे या ठिकाणी ओसामा हा राहणारा असून त्याचे आशिष शेलार यांच्यासोबत वाद असल्याचे समजते. वांद्रे युनिट ९ ने अटक करून वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आशिष शेलार यांना मागील काही दिवसांपासून दोन मोबाईल क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती, धमकी देणाऱ्याने पूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. आशिष शेलार यांनी पोलिस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री यांना लेखी तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा आता आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी…)

यापूर्वीही अशाच प्रकारे शेलारांना दिलेली धमकी 

यापूर्वीही अशाच प्रकारे भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांना धमकी देण्यात आली होती. त्यात पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती. भाजपचे नेते आशिष शेलार यांना यावेळीही फोनवरून धमकी देण्यात आली. शेलार यांना अज्ञात व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन आले. शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अर्वाच्च भाषा वापरली. या प्रकारानंतर शेलार यांनी तातडीने मुंबई पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here