प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानी चरणी 75 तोळे सोने अर्पण

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजा भवानीला 75 तोळे सोने अर्पण केले आहे. आमदार सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जवळपास 37 लाख 50 हजार रुपये किमतीचे दागिने देवीचरणी अर्पण करण्यात आले आहेत. संपूर्ण सरनाईक कुटुंबाने मनोभावे देवीचे दर्शन घेऊन केलेला नवस फेडला. दोन्ही मुलांची लग्न होऊन सगळे काही व्यवस्थित होऊ देत, असा नवस सरनाईक यांनी देवीला बोलला होता. त्यानुसार, गुरुवारी सरनाईक कुटुंबाने तुळजा भवानीला येऊन नवसपुर्ती केली.

( हेही वाचा: भगतसिंह कोश्यारींना तत्काळ पदावरुन दूर करा; उदयनराजेंनी केली पंतप्रधानांकडे तक्रार )

तुळजाभवानी आमची कुलदैवता

प्रताप सरनाईक म्हणाले की, तुळजा भवानी देवी आमची कुलदैवत आहे. दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळी आम्ही देवीला नवस बोललो होतो. गुरुवारी माझ्या नातवंडांचे जावळ करायचे होते. त्यामुळे नवस फेडण्यासाठी आम्ही सगळे कुटुंबिय देवीला आलेलो आहोत. 51 तोळ्यांच्या पादुका आणि 21 तोळ्यांचा हार असा नवस मी देवीला बोललो होतो. त्यानुसार गुरुवारी सगळ्या कुटुंबाला घेऊन मी देवीचरणी लीन झालो. नवस फेडला, अशा भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here