आमचे फटाके २३ नोव्हेंबरला फुटणार;  Amit Thackeray नी व्यक्त केला विश्वास

51
आमचे फटाके २३ नोव्हेंबरला फुटणार;  Amit Thackeray नी व्यक्त केला विश्वास
आमचे फटाके २३ नोव्हेंबरला फुटणार;  Amit Thackeray नी व्यक्त केला विश्वास
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

माहीम विधानसभा मतदार संघातून मनसेच्यावतीने अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी माहीमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात बोलतांना अमित ठाकरे यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त करत दिवाळी ३ नोव्हेंबरला संपत असली तरी आमचे फटाके मात्र २३ नोव्हेंबरलाच फुटणार असे सांगितले. विशेष म्हणजे हा मतदार संघ जिंकून मला राजसाहेबांना भेट दयायचा आहे असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

माहीम विधानसभेच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा एक मेळावा गुरुवारी पार पडला. मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार, उपविभाग अध्यक्ष मनिष चव्हाण आदींसह पदाधिकारी व  कायकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात माहीम विधानसभेचे मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या पहिल्याच मार्गदर्शनपर भाषणात पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वास देत केवळ पक्षासाठी मी जबाबारीने हे पाऊल उलचले आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि मागणीमुळेच मला आज माहीमची उमेदवारी मिळाली आहे. (Amit Thackeray)

(हेही वाचा- CJI D Y Chandrachud: वाढत्या प्रदूषणावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “मी…”)

मला माहीममधून उमेदवारी मिळणार हे शेवटच्या क्षणापर्यंत माहित नव्हते. साहेबांनी मला प्रथम बोलावून आमदाराचे काम काय असते, तुझी तयारी आहे ना असे विचारले. तिन वेळा साहेबांनी मला विचारले आणि तिन्ही वेळेला मी निवडणूक लढण्यास तयार असून मी शंभर टक्के  निवडून येईन असे सांगितले. हा सर्व विश्वास मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर बोलून दाखवला आहे. (Amit Thackeray)

अमित ठाकरे यांनी विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर अप्रत्यक्ष तोंडसुख घेत मी लहान असल्यापासून त्यांना नगरसेवक, आमदार पहातोय. पण दादर माहीमचा विकास कुठे झालाय. एखाद्या डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर जर त्यांच्याकडे उपचार चांगला मिळत नाही तेव्हा दुसऱ्यांदा त्यांच्याकडे जात नाही, तर डॉक्टर बदलतो. त्यामुळे या विभागाचे, राज्याचे आरोग्य बिघडले असून चांगल्या सर्जनची गरज आहे,असे सांगत लोकप्रतिनिधीने, भविष्यातील पिढीने विकासकामांबाबत नाव काढले पाहिजे असे काम करून ठेवले पाहिजे हाच माझा प्रयत्न राहील असे सांगितले. (Amit Thackeray)

(हेही वाचा- Zeeshan Siddique यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश; वांद्रे पूर्वची उमेदवारी)

ही विधानसभा जिंकून मला राजसाहेबांना दिवाळीची भेट द्यायची आहे. दिवाळी ३ ते ४ तारखेला संपत असली तरी दिवाळीत कुणाला फटाके वाजवायचे ते वाजवू दया, आपले मात्र फटाके हे २३ नाव्हेंबरलाच फुटतील अशा शब्दांत त्यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. (Amit Thackeray)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.