पालघरमध्ये आज म्हणजेच गुरुवार १५ जून रोजी सकाळी शासन आपल्या दारी या योजनेचा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरच्या दिशेने रवाना झाले. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जाहिरात वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘कितीही फाटे फुटले तरी आमची मैत्री तुटायची नाही’ असं म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
हे सरकार एक वैचारिक सरकार आहे. गेल्या २० वर्षांपासूनची आमची जिवाभावाची मैत्री आहे, कितीही फाटे फुटले तरी आमची मैत्री तुटायची नाही, कोणी कितीही प्रयत्न केला तरीही ये फेव्हिकॉलका जोड है हा कोणी तोडू शकणार नाही. काही जण म्हणतात आमची जोडी ही जय – वीरूची जोडी आहे. पण आमची जोडी ही युतीची जोडी आहे, या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आमची जोडी आहे. ही जोडी खुर्चीसाठी झालेली नाही किंवा स्वार्थासाठी झालेली नाही. म्हणूनच सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही आणि अजूनही आमचे पाय जमिनीवर आहेत. जे स्वार्थासाठी एकत्र झाले त्यांना जनतेने बाजूला केले. आमचं काम पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरते. पूर्वीच्या सरकारने केलेली चूक वर्षभरापूर्वी आम्ही सुधारली आणि जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं. म्हणूनच आज राज्य सरकारला लोकांनी पसंती दिली आहे. पण देशातील ८४ टक्के जनतेनी पंतप्रधान मोदींना पसंती दिली आहे याचा मला जास्त आनंद आहे. या देशाचा मान विदेशात पोहोचवण्याचं काम पंतप्रधानांनी केलं आहे. एकीकडे सगळ्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला जात असतांना मोदींनी भारताची अर्थव्यवस्था दहाव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर नेऊन ठेवली आहे. (Eknath Shinde)
पालघर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’! https://t.co/DVWc0srpZE
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 15, 2023
आतापर्यंत ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपलं शासन पोहोचलं आहे
पालघरमध्ये शासन आपल्या दारी सोबतच रोजगार मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले. यामधून कमीत कमी दोन ते तीन हजार तरुणांना नोकऱ्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी सर्वसामान्य जनता एवढ्या मोठ्या प्रमाणात आली आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. आतापर्यंत तब्बल ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपलं शासन पोहोचलं आहे. हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नाही. उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच शासन आणि आताच शासन बदलेलं आहे, म्हणूनच सर्वसामान्य लोकांना सरकारने घेतलेले निर्णय, योजना याचा लाभ घेण्यासाठी सरकारी कचेऱ्यांमध्ये फेरा माराव्या लागू नये म्हणून शासनाने ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा जन्म झाला. (Eknath Shinde)
सर्वसामान्य जीवनाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणणे हेच या सरकारचे उद्दिष्टय
सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षाभरापूर्वी स्थापन झालं. मी हे अभिमानाने सांगीन की सुरुवातीच्या मंत्रिमंडळात मी आणि फडणवीस साहेब आम्ही दोघेच होतो तेव्हापासूनच्या आणि आताच्या कॅबिनेटमध्ये आम्ही केवळ सर्वसामान्य जनतेच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून आमचे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे हे सिद्ध झाले आहे. या योजनेतून जवळपास ३ लाख लाभार्थ्यांना २१२ कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. सर्वसामान्य जीवनाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणणे हेच या सरकारचे उद्दिष्टय आहे. उद्योगवाढीसाठी सरकारने रेड कार्पेट दिले. पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या जीवनात बदल घडवण्याचा सरकारचा उद्देश आहे. विरार ते पालघर हा प्रकल्प आणण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. (Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community