राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे गट आणि भाजपचे हे सरकार फार काळ टिकणार नाही. ते फारफार तर पाच ते सहा महिने टिकेल. तसेच, मध्यवर्ती निवडणुका लागतील, असे विधान केले होते. त्याला भाजपाकडून विरोध होत आहे. पवार बोलतात त्याच्याविरुद्ध घडते, आमचे सरकार पुढची दशकानुदशके टिकेल, असा विश्वास भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. शिंदे सरकारवरचा विश्वास 4 जुलैला समंत होईल, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. रविवारपेक्षा सोमवारी जास्त मतं घेण्यात आम्हाला यश येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: बहुमत चाचणीआधी शिवसेनेला धक्का; आमदार संतोष बांगर शिंदे गटात! )
आमचे सरकार पुढची दशकानुदशके टिकेल
सहा महिन्यात मध्यावर्ती निवडणुका लागण्याची शक्यता प्रवीण दरेकरांनी फेटाळली. शरद पवार जे बोलतात त्याच्याबरोबर उलट घडते. त्यामुळे पुढची काही दशके हे सरकार काम करत राहिलं, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पवार म्हणाले होते की, आमदार मुंबईत आल्यावर त्यांचे मतपरिवर्तन होईल, पण तसे काही झाले का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला धक्का लागण्याची कोणतीही शक्यता नाही, असे प्रवीण दरकरांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community