जयंत पाटील यांनी गमावली स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत

129

शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांना स्वतःच्या गावातील ग्रामपंचायतही राखता आलेली नाही. रायगड जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात ‘शेकाप’ला केवळ दोन जागांवर यश मिळाले आहे.

( हेही वाचा  : महापालिकेच्या तीन उपायुक्तांची खांदेपालट; बालमवार यांच्याकडे आता मध्यवर्ती खरेदी विभागाची जबाबदारी)

रायगड जिल्हा, विशेषतः अलिबाग तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या गडाची तटबंदी सातत्याने ढासळत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकलांतही त्याची परिणिती दिसून आली. रायगडमधील १६ ग्रामपंचायतींपैकी शेकापला केवळ दोनच ठिकाणी यश मिळाले असून, इतरत्र मोठी हार पत्कारावी लागली आहे.

विशेष म्हणजे अलिबाग आणि पनवेलमधील हक्काच्या ग्रामपंचायतीत शेकापचा पराभव झाला आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांना आपली वेश्वी ग्रामपंचायतही राखता आलेली नाही. अडीच वर्षे वगळता वेश्वी ग्रामपंचायतीवर कायम जयंत पाटील यांचे वर्चस्व राहिलेले आहे.

कोणाकडे किती ग्रामपंचायती?

  • बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) – ४
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – ३
  • शेतकरी कामगार पक्ष – २
  • राष्ट्रवादी – १
  • भाजपा – १
  • स्थानिक आघाड्या – ५

गोगावले यांनाही धक्का

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकलांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आघाडीवर आहे. मात्र, या पक्षाचे आमदार भारत गोगावले मतदार असलेल्या खरवली ग्रामपंचायतीत त्यांना आपला सरपंच निवडून आणता आलेला नाही. त्यामुळे गोगावले यांना हा धक्का मानला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.