‘भोंगा अजान’ मधून चित्रपट मालकांची माघार

125
प्रदर्शनाआधीच मनसेचा ‘भोंगा’ वादात अडकला असून ‘भोंगा अजान’ हा मराठी चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यापासून मालकांची माघार घेतल्याची माहिती मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे २४ तास उरलेले असताना चित्रपट गृहांच्या मालकांनी अशाप्रकारे अडेलतट्टूची भूमिका घेतल्याने या चित्रपटाचे निर्माते आणि वितरक चिंतेत पडले आहेत.
भीतीपोटी हे सुरु आहे मनसेचा आरोप
‘भोंगा अजान’ मंगळवारी 3 मे रोजी चित्रपटगृहात  प्रदर्शित होणार आहे. याआधी ओटीटीवर  हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. मनसे सिनेकर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती चित्रपटगृह मालकांना महाविकास आघाडी सरकारकडून दाखवली जात आहे. त्यामुळे चित्रपटगृह मालक भीतीपोटी माघार घेत असल्याचा आरोप मनसेचे अमेय खोपकर यांनी केला आहे. चित्रपटगृह मालकांना हा चित्रपट लावावाच लागेल अन्यथा हिंदी चित्रपटांचे खेळ होऊ देणार नाही असा विनंती वजा इशारा खोपकर यांनी दिला आहे.
( हेही वाचा आनंदाची बातमी! एसी लोकलबरोबरच फर्स्ट क्लासही स्वस्त )

हा महाराष्ट्र आहे, पाकिस्तान नाही
भोंगा अजान’ हा चित्रपट धार्मिक नाही, तर तो सामाजिक चित्रपट  आहे, असे सांगत महाराष्ट्र सैनिक चित्रपटगृहांना सरंक्षण देण्यास तयार आहेत. महाराष्ट्रात ६५ चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपटगृह मालकांशी  या चित्रपटाबाबत खूप आधी बोलणी झाली होती, असेही अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. ट्रेलर नुकताच रिलीज केला आहे. चित्रपट प्रदर्शित न करायला कोण दबाव आणतंय त्याचं फक्त नाव कळू द्यात, असे सांगत त्यांनी हा महाराष्ट्र आहे, पाकिस्तान नाही, हेही लक्षात ठेवावे असाही इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.