आम्हाला पण तुमच्यात घ्या ना! कमकुवत झालेल्या काँग्रेसची ‘आप’ला हाक

130

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. तसेच काँग्रेसमधील एक गट देखील नाराज असल्याने पक्षामध्ये गृहकलह निर्माण झाला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नमते घेणार असल्याचे दिसतेय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले असून कमकुवत झालेल्या काँग्रेसने ‘आप’ला आर्त हाक दिली आहे.

आप-तृणमूल काँग्रेससोबत युती करणार?

येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आप आणि तृणमूलसोबतच्या आघाडीत काँग्रेस लहान भावाची भूमिका स्वीकारून आप आणि तृणमूल काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केले आहे.

(हेही वाचा -महाविकास आघाडीतल्या नेत्यालाच राऊतांनी दिला असा सल्ला!)

काय म्हटले पी. चिदंबरम?

काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुका तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी सारख्या पक्षांसोबत युती करून लहान भाऊ म्हणून लढण्यासाठी सज्ज आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तडजोड करायला तयार आहे. बंगालमध्ये आपल्याला तृणमूलच्या नेतृत्वाखाली लढावे लागणार आहे. पंजाबमध्ये ‘आप’च्या नेतृत्वाखाली लढावे लागणार आहे. भाजपा विरोधात राज्या-राज्यांत लढण्यासाठी याची गरज असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

चिदंबरम यांचा प्रियांका गांधींवर निशाणा

चिदंबरम यांनी अप्रत्यक्षरित्या प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात पक्षाची कामगिरी चांगली झालेली नाही हे सर्वांनाच माहित आहे. उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी आणि दुसरीकडे निवडणूक लढवणे ही दोन कामे करण्याचे प्रयत्न केले. ही दोन्ही कामे एकाच वेळी होऊ शकत नाहीत असा इशारा मी त्यांना आधीच दिला होता. पक्षाची पुनर्बांधणी आधी व्हायला हवी आणि निवडणुकांमध्ये जाणे नंतरही होऊ शकते. परंतु दुर्देवाने पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाच वेळी झाली असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.