आंध्र प्रदेशातील Pakistan वसाहतीचे अखेर झाले नामांतर; जाणून घ्या काय आहे नवे नाव?

आता इथे राहणाऱ्या नागरिकांच्या आधारकार्डावरही पत्त्यामध्येही हा बदल करण्यात आला आहे. वसाहतीचे नाव बदलल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

90
भारतात आंध्र प्रदेशात एका गावाचे वर्षानुवर्षे ‘पाकिस्तान’ (Pakistan)  या नावाने ओळख होती. देशाच्या क्रमांक एक असलेल्या शत्रू राष्ट्राचे नाव या वसाहतीला होते, जे कायम अनेकांना खुपत होते, अखेर या वसाहतीचे नाव बदलण्यात आले आहे. या वसाहतीचे नाव आता ‘भागीरथ’ असे करण्यात आले आहे.
आंध्रच्या विजयवाडा जिल्ह्यात हे गाव आहे. १९७१ च्या युद्धात भारताचा विजय झाला. त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. त्यात पूर्व पाकिस्तान (Pakistan) हा बांगलादेश बनला. त्यावेळी अनेक निर्वासित भारतात आले. त्यावेळीच्या सरकारने त्या निर्वासितांना निवारा दिला. मात्र ते ज्या भागात राहू लागले त्या वसाहतीला पाकिस्तान (Pakistan) नाव देण्यात आले. तेव्हापासून या भागाची ओळख पाकिस्तान म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर हे नाव बदलण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार आता महापालिका अधिनियम कलम ४१८ अन्वये या वसाहतीचे नाव बदलण्यात आले आणि ‘भागीरथ’ असे नाव दिले. आता इथे राहणाऱ्या नागरिकांच्या आधारकार्डावरही पत्त्यामध्येही हा बदल करण्यात आला आहे. वसाहतीचे नाव बदलल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.