उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकावले; Nitesh Rane यांचा आरोप

229
उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकावले; Nitesh Rane यांचा आरोप

लोकसभा २०२४ (Lok Sabhaa election 2024) च्या निवडणुकीसाठी देशभरात मतदान सुरू आहे. आतापर्यंत चार टप्प्यात मतदान पूर्ण झाले असून, येत्या सोमवारी महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांमध्ये मुंबईतील लोकसभेच्या जागांचा अधिक समावेश आहे. मुंबईतील मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निवडणुकीसाठी मोठी लढत लागली आहे. अशातच भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी एक्सच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये उबाठा UBT गटाच्या मिरवणुकीत पाकीस्तानचे झेंडे (Pakistani Flags) फडकावल्याचा दावा राणे यांनी केला आहे.  (Nitesh Rane)

दरम्यान, कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी एक्सच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओमध्ये राणे यांनी म्हटले आहे की, उबाठा गटाच्या मिरवणुकीत पाकीस्तानचे झेंडे फडकावल्याचे दिसून आले. तर उबाठा गटाचे निवडणूक चिन्ह मशाल याचा उल्लेख ही या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहेत. आमदार नितेश राणे यांनी संबंधीत व्हिडीओ कधीचा आहे याचा उल्लेख मात्र केलेला नाहीये. (Nitesh Rane)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज केला दाखल)

 पोस्टमध्ये नेमके काय म्हणाले नीतेश राणे?

या संदर्भात आमदार नीतेश राणे यांनी एका पोस्टच्या माध्यामतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘UBT च्या मिरवणुकित पाकिस्तान चा झेंडा ! आता काय PFI, SIMI, AL QAEDA चे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील… हे दाऊदचे मुंबईत स्मारक पण बांधतील.. आणि म्हणे हा मा. बाळासाहेबांचा “असली संतान” असा सवाल ही राणेंनी उपस्थित केला. (Nitesh Rane)

अनिल देसाई यांची प्रचार रॅली

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांना मुंबई दक्षिण-मध्यमधून तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या प्रचारादरम्याचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याची सत्यता पडताळावी लागणार आहे. या व्हिडिओ मध्ये ऐकू येत असलेल्या संवादानुसार मशाल चिन्हाचा तसेच अनिल देसाई यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

(हेही वाचा – Harvard University मधील संशोधकांनी सांगितली अकाली मृत्यूची ‘ही’ कारणे  )

नेमके सत्य कारण काय ?

राणे यांनी उल्लेख केलेल्या झेंड्या संबंधी दाव्यामागील सत्यता पडताळली असता. हा झेंडा पाकीस्तानी नसून भारतीय मुस्लिम नागरिकांचा धार्मिक ध्वज आहे. संबंधीत व्हिडीओ अनिल देसाई यांच्या चेंबूर येथील प्रचार सभेतील मिरवणूकीमधला आहे.  (Nitesh Rane) 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.