हाफिस सईदच्या घराशेजारी बॉम्बस्फोट! पाकिस्तानची नवी रणनीती! 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी हाफिज सईद याच्या घराच्या बाहेरच बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे आयएसआयचा हात आहे, असा आरोप होऊ लागला आहे. 

85

सध्या पाकिस्तानला मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तेथील दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या ग्रे यादीत टाकले आहे. या यादीतून बाहेत पाडण्यासाठी पाकिस्तानचे याआधीच अनेक प्रयत्न विफल ठरले आहेत. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून पाकिस्तान दहशतवादाच्या म्होरक्यांपासून मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने त्यासाठी योजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी हाफिज सईद याच्या घराच्या बाहेरच बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे आयएसआयचा हात आहे, असा आरोप होऊ लागला आहे.

लाहोर येथील अल्लाहू बोलवार्ड नाक्यावर हाफिस सईद राहतो. हा स्फोट याच ठिकाणी झाला आहे. या स्फोटात ३ जणांचा मृत्यू तर २१ जण घायाळ झाले आहेत. हाफिज सईद हा लष्कर-ए -तोयबाचा संस्थापक आहे, आता तो जमात-उद-दावा ही संघटना चालवत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी पोलिस कायम तैनात असते. या स्फोटात ;पोलिस कर्मचारीही घायाळ झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या अनुसार या स्फोटाच्या वेळी हाफीस सईद हा घरीच होता. म्हणूनच या स्फोटानंतर पाकिस्तान आता जुन्या दशतवादी संघटनांच्या म्होरक्यांपासून मुक्ती मिळवत आहे का? ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानात दहशतवाद संपुष्टात आला आहे, असे दर्शविण्याचा प्रयत्न होत आहे.

(हेही वाचा : कोरोनामुळे नक्षलवादी चळवळीला भगदाड! आता नक्षली नेता हरिभूषणचा मृत्यू!)

एफएटीएफची यादी बनली डोकेदुखी! 

जून २०१८ मध्ये पॅरिस येथे फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने पाकिस्तानला दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहाय्यता करण्याच्या आरोपांवरून ग्रे यादीत टाकले. पाकिस्तान एफएटीएफच्या आशिया समूहाचा सदस्य आहे. त्यामध्ये ४० देशांचा सहभाग आहे. या यादीतुन बाहेर पडल्याशिवाय पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. त्यासाठी आता पाकिस्तान दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना लक्ष्य करू लागला आहे. या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला २७ अटी शर्थीची पूर्तता करावी लागणार आहे.

कोण आहे हाफिस सईद?

हाफिस सईद हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दहशतवादी आहे. जमात-उद-दावा ही संघटना तो चालवतो. त्याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हाफिज सईदचे नाव मुंबई हल्ल्यातही आले आहे. या प्रकरणी पाकिस्तानने त्याला ३६ वर्षांची शिक्षा ठोठावून न्यायालयीन कोठडीत बंद केले होते. मात्र तरीही हा दहशतवादी प्रत्यक्षात मात्र लाहोर स्थित स्वतःच्या घरात आरामात राहत आहे.

(हेही वाचा : हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या त्या ‘मौलवीं’च्या मुसक्या आवळल्या! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.