सध्या पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये इतके वाईट दिवस सुरू आहेत की, तिथल्या लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तुही पुरवल्या जात नाहीयेत. आटा-तांदूळ आणि गहूसाठी लोकं तासनतास रांगा लावत आहेत. पाकिस्तानमधील या गंभीर परिस्थितीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गंभीर परिस्थितीदरम्यान पाकिस्तानमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) चर्चा अधिक केली जात आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डेलीने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. डेलीने मोदींचे कौतुक करताना लिहिले आहे की, ‘मोदींच्या नेतृत्वात भारत आज उच्च स्थानी पोहोचला आहे. याचा प्रभाव संपूर्ण जगावर होत असल्याचे दिसत आहे.’
पाकिस्तानी वृत्तपत्र डेलीने लिहिले आहे की, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचे परराष्ट्र धोरण चांगले झाले आहे आणि जीडीपी ३ ट्रिलिअन डॉलरहून अधिक झाला आहे.’ डेली वृत्तपत्रासोबत द एक्सप्रेस ट्रिब्यूननेही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये जागतिक स्तरावरील भारताच्या वाढत्या उंचीबद्दल चर्चा केली आहे. द एक्सप्रेस ट्रिब्युनच्या एका कॉलममध्ये पाकिस्तानचे प्रसिद्ध राजकीय, सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषक शहजाद चौधरींनी लिहिले की, ‘सध्या भारत गुंतवणूकदारांसाठी सर्वात पसंतीचे स्थान झाले आहे. भारताने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात परराष्ट्र धोरणाच्या आधारावर स्वतःचे क्षेत्र तयार केले आहे.’
परराष्ट्र धोरणासोबत भारत कृषी आणि आयटी उद्योगात वेगाने पुढे जात आहे. याबाबत चौधरींनी पुढे लिहिले की, ‘भारताचे शेतीचे प्रति एक उत्पादन जगातील सर्वोत्तम आहे.’ आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, ‘भारताची शासन व्यवस्था काळाच्या कसोटीवर उभी आहे. भारताला ब्रँड बनवणे ज्यांना कोणाला जमले नाही ते पंतप्रधान मोदींनी केले.’ यापूर्वी नोव्हेंबर २०२३मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते.
(हेही वाचा – ‘…तर श्रद्धांजली वाहावी लागली असती’; लिफ्टमधील घटनेबाबत पवारांनी सांगितला थरारक किस्सा)
Join Our WhatsApp Community