पाकिस्तानात अखेर इम्रान सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर शाहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आरूढ झाले. त्यानंतर लागलीच शादबाज यांनी काश्मीरच्या प्रश्नाला हात घातला, मात्र तो कोणत्या कुरघोडीच्या हेतूने नव्हे, तर भारताशी बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी आहे. शाहबाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर विषयावर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.
इम्रान खान यांनी भारताशी व्यापार थांबवला होता
शरीफ हे १७४ मते मिळवून इम्रान सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव जिंकला. त्यांनी इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार शाह मोहम्मद कुरैशी यांना मात दिली आहे. संसदेत मतदानापूर्वी इम्रान खान यांच्या पक्षातील सर्व खासदारांनी राजीनामा देत सभागृहाचा त्याग केला. शाहबाज यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश जारी केला आहे. यामध्ये काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेची तयारी दर्शविली आहे. काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार काश्मीरचा प्रश्न सोडविला पाहिजे, असे ते म्हणाले. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरु ठेवू शकत नाही, असा दम पाकिस्तानला देत मोदी सरकारने पाकिस्तानशी चर्चा थांबविली होती. तसेच काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला होता. यावरून पाकिस्तानचे हटविण्यात आलेले पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी व्यापारही थांबविला होता. त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहेत.
(हेही वाचा सोमय्यांना अटक होणार, मंगळवारी नीलचा फैसला)
काश्मिरी जनतेची गरिबी दूर व्हावी
आता शाहबाज यांनी पुन्हा काश्मीर मुद्दा उकरला आहे. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. जोवर काश्मीरवर शांततेच्या मार्गाने तोडगा निघत नाही, तोवर हे शक्य नाही. आम्ही काश्मिरी लोकांना त्यांच्या परिस्थितीवर सोडू शकत नाही. राजनैतिकदृष्ट्या आम्ही काश्मिरी जनतेला आमचा पाठिंबा देत राहू, काश्मीर प्रश्नावर तोडगा फक्त आणि फक्त काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसारच हवा. त्यांच्या वेदना कमी झाल्या पाहिजेत, तेथील गरिबी दूर व्हायला हवी, असे शाहबाज म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community