पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी पाकिस्तानला (Pakistan) दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी सरकारी कंपन्या विकण्याचा असल्याचे सांगितले. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. आशा आहे की, लवकरच चांगले परिणाम येण्यास सुरुवात होईल. आमच्या सरकारी कंपन्यांमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान होत आहे. लवकरच आम्ही ते खासगी क्षेत्राकडे सोपवू. यामुळे सरकारी तिजोरीत पैसा येईल आणि या कंपन्यांच्या कामकाजातही सुधारणा होईल.
खाजगीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन
काकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, बहुतेक सरकारी कंपन्या मोठ्या तोट्यात आहेत आणि सरकारसाठी बोजा बनल्या आहेत. त्यामुळे आम्ही एक टीम तयार केली आहे जी लवकरात लवकर या सरकारी कंपन्यांना खाजगी क्षेत्राकडे सोपवण्याचा आराखडा सादर करेल. त्यानंतर 6 महिन्यांत या कंपन्या खासगी क्षेत्राला विकल्या जातील. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स त्यापैकी एक असेल, असे मानले जात आहे.
Join Our WhatsApp Community