शिवसेनेतून नाराज आमदारांची हकालपट्टी करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. सोमवारी संतोष बांगर यांच्या हकालपट्टीनंतर आता मंगळवारी रवींद्र फाटक आणि राजेश शहा यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता हळूहळू कारवाईचा बडगा उगारताना दिसत आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातून कारवाईबाबतचे वृत्त देण्यात आले आहे.
पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.
( हेही वाचा: राज ठाकरेंची भविष्यवाणी झाली खरी; संजय राऊत एकटे पडले…)
शिवसेना भवनात बैठकांचा जोर वाढला
दरम्यान, आता स्थानिक पातळीवरील नेतृत्वातही बदल करण्यात आले आहेत. शिंदे गटात सामील होणा-यांची संख्या पाहता उद्धव ठाकरे सतर्क झाले आहेत. शिवसेना भवनात आता बैठकांचा जोर वाढला आहे. खासदार, जिल्हा प्रमुख आणि स्थानिक शिवसेना पदाधिका-यांच्या बैठका उद्धव ठाकरेंनी घेतल्या. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांकरता शिवसेना महिला पदाधिका-यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Join Our WhatsApp Community