आत्महत्येचा इशारा देणारे पालघरचे विद्यमान आमदार Srinivas Vanga ‘नॉट रिचेबल’

164
आत्महत्येचा इशारा देणारे पालघरचे विद्यमान आमदार Srinivas Vanga ‘नॉट रिचेबल’
आत्महत्येचा इशारा देणारे पालघरचे विद्यमान आमदार Srinivas Vanga ‘नॉट रिचेबल’

महाराष्ट्रातील पालघर मतदारसंघातून (Palghar Constituency) शिवसनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) यांचे तिकीट रद्द झाल्याने त्यांची अवस्था बिकट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना पालघरमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेले श्रीनिवास वनगा हे माध्यमांसमोर येत आपल्या मनात आत्महतेसारखा विचार येत असल्याचे सांगितले. वनगा हे सोमवारी सायंकाळपासून घराबाहेर पडले आहेत ते अजून परतलेच नाहीत. तसेच वनगा यांचे दोन्ही फोन बंद आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेले कुटुंब व पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहेत.  (Srinivas Vanga)

श्रीनिवास यांनी शिंदे यांच्यावर आरोप केले 

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. बंडखोरीदरम्यान पाठिंबा दिलेल्या 40 पैकी 39 आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले असले तरी त्यांना तिकीट देण्यात आले नाही. श्रीनिवासच्या पत्नीचे म्हणणे आहे की, श्रीनिवास डिप्रेशनमध्ये गेले आहे. रविवारपासून ते जेवत नाही आणि सतत रडत होते. तसेच, याच तणावातून टोकाचं पाऊल उचलण्याचे विचारही त्यांच्या मनात येऊ लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अशातच आता ते नॉट रिचेबल असल्यामुळे सर्वजण चिंतेत सापडले आहेत. त्यात वनगा यांचे दोन्ही फोन बंद आहेत. कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे. उद्धव ठाकरेंसारख्या देवासारखा माणूस सोडणं ही त्यांच्या कुटुंबाची मोठी चूक होती. अशी खंत ही माध्यमांसमोर बोलून दाखवली. 

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : वंचितच्या उमेदवारांची नववी यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांनाही देणार टक्कर)

उबाठाचे पदाधिकारी वनगांच्या भेटीला

श्रीनिवास वनगा माध्यमांसमोर ढसाढसा रडल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर उबाठा गटांनी (UBT Group) सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी वनगांच्या घरी शिवसेना उबाठा गटाचे वसई जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांना सांगितले. त्यावेळीही श्रीनिवास वनगा हे घरी नव्हते. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचा शोध सुरू आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.