तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम ८ टप्प्यात पूर्ण होईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराजांच्या देहू येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले.
यासर्व टप्प्यात ३५० किमीहून अधिक लांबीचे महामार्ग
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या भूमिपूजनाची संधी मिळाली होती. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची सुरुवात पाच टप्प्यात होणार. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम ३ टप्प्यात पूर्ण होईल. या सर्व टप्प्यात ३५० किमीहून अधिक लांबीचे महामार्ग बनतील. यासाठी ११ हजार कोटींहून अधिक खर्च केला जाईल. या प्रयत्नांमुळं या भागातील विकासाला चालना मिळेल, असं मोदी यावेळी म्हणाले.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर शुक्रवारी होणार निर्णय)
वारकऱ्यांच्या स्वागताचे मोदींनी मानले आभार
‘असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे’ या अभंगाचे महत्त्व सांगून पंतप्रधानांनी वारकऱ्यांनी केलेल्या स्वागताचे आभार मानले. आज, मंगळवारी येथे संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंगगाथेचे माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले. या सार्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या ५०० पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आले आहेत. संत तुकाराम सांगायचे की, ‘उच निच काही नेणे भगवंत | तिष्ठे भाव रक्षी देखोनिया’ समाजात उच्च नीचतेचा भेदभाव करणे हे पाप आहे. त्यांचा हा उपदेश भक्तीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच हा उपदेश राष्ट्रभक्ती तसेच समाजभक्तीसाठी महत्त्वाचा आहे.
Join Our WhatsApp Community