“‘ग्रामस्वराज’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था महत्त्वाची”

147

‘ग्रामस्वराज’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. या व्यवस्थेला दिशा देण्याचे काम सर्व लोकप्रतिनिधी, पंच-सरपंच करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. गुजरातच्या अहमदाबाद येथील जीएमडीसी मैदानावर आयोजित महा-पंचायत संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते.

भाजपच्या बंपर विजयानंतर मोंदींची नजर गुजरातकडे

देशातील उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बंपर विजयानंतर आता त्यांची नजर गुजरातकडे लागली आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारी गुजरातमध्ये पोहोचले. पंचायत महासंमेलनात सहभागी होण्यापूर्वी पीएम मोदींनी कारमधून रोड शो केला. विमानतळावरून सुरू झालेला हा रोड शो 10 किमी अंतरावर असलेल्या गांधीनगर येथील भाजपचे राज्य मुख्यालय कमलम येथे संपला. मोदींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील हेही उपस्थित होते.

(हेही वाचा- मविआ मधल्या तिन्ही पक्षांचे खासदारही ‘डागाळलेले’! इतक्या खासदारांवर गुन्हे दाखल)

काय म्हणाले मोदी?

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, गुजरात ही बापू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमी आहे. ग्रामीण विकासाची, स्वावलंबी गावांची नेहमीच चर्चा होते. महात्मा गांधी नेहमीच ग्रामीण विकास, स्वावलंबन आणि मजबूत खेडे यावर बोलत. देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी आपले आयुष्य वेचले आणि आहुती दिली त्यांची स्वप्ने साकार झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या क्षेत्रातील बालकांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्याकरता विद्यालयांचे वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरे करावेत. गुजरातमध्ये पंचायत राज व्यवस्थेत पुरुषांपेक्षा महिलांचे प्रतिनिधित्व जास्त आहे. राज्यातील दीड लाखांहून अधिक संख्येने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी एकत्र बसून गुजरातच्या उज्ज्वल भविष्याची चर्चा करावी यापेक्षा मोठी संधी असूच शकत नाही. लोकशाहीची यापेक्षा मोठी शक्ती असूच शकत नाही. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सवा’दरम्यान प्रत्येक गावात 75 झाडे लावण्याचे आवाहन ग्राम प्रतिनिधींना केले.

मोदींनी दिलं वचन

कोरोना महामारीच्या काळातही आपल्या लहान शेतकऱ्यांनी अन्नाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली. आमचा सर्वात मोठा खर्च पाण्यावर होतो. धरणे बांधून आपण पाण्याची बचत करत आहोत. आम्ही आमच्या गावाभोवती धरण बांधून पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा निर्णय घेतला. गावागावातील पाण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करू. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यायला हवे, असे पंतप्रधानांनी सांगितले. संपूर्ण गावाने एकत्र यावे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात गावात जागा शोधून तिथे 75 झाडे लावायची हे ठरवायचे आहे. यंदापासून 75 शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.