“ऊर्जामंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये?”

108

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांना चांगली वागणूक मिळत नाही. सरकारची सारी धोरण शेतकरीविरोधी असून हा वर्ग जणू काही आमचा शत्रुच आहे. अशा प्रकारची सापत्न वागणूक त्यांना मिळते. पंढरपूर विठ्ठलाच्या दरबारात सुरज जाधव या तरूण शेतकर्‍याने केवळ सरकारच्या आडमुठेपणामुळे आत्महत्या केली असून, याला सर्वस्वी महावितरण कंपनी आणि राज्याचे ऊर्जामंत्री जबाबदार असल्याची जोरदार टीका भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

निजामासारखी वसूली केली

सुरज जाधव सोलापुर जिल्ह्यातील मगरवाडीचे रहिवाशी 22 वर्षाच्या तरूण शेतकर्‍याने फेसबुक लाईव्ह करत मी आत्महत्या का करतो? याला राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे, म्हणून शेतात विष प्राशन केलं. मुळात हे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांना मिळणार्‍या सवलती बंद झाल्या. कुठलेही अनुदान मिळत नाही. विमा मिळत नाही. अतिवृष्टीमुळे पिकाचं आणि शेतीचं नुकसान झालं, तरी आर्थिक मदत भरीव नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, राज्यातील शेतकर्‍यांच्या नावावर दिवसाआड बँकेत वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान पडायचे. रात्री अपरात्री मोबाईलच्या ठोकड्याचा मॅसेज वाजला की, पैसे पडले ही ओळख तयार झाली होती. मात्र शेतकरीविरोधी सरकार सत्तेवर आल्यापासून एक दमडी शेतकर्‍यांना मिळत नाही. कोरोनासारख्या संकटामुळे अगोदरच शेती उद्योग धोक्यात आला. मागच्या वर्षी पाऊस प्रचंड झाला. पाण्याची पातळी वाढली पण शेतकर्‍यांना उपसा करण्यासाठी वीज वेळेवर नाही. सतत पुरवठा होत नाही. एवढंच काय सवाच्या आवा बीले देऊन निजामासारखी वसूली करायची आणि ज्या शेतकर्‍यांची वीज बाकी मिळाली नाही, त्यांची कनेक्शन बंद करण्याची भूमिका ठाकरे सरकारने घेतली. ज्यामुळे शेतकरी प्रचंड वैतागून गेला आहे.

( हेही वाचा: केंद्र सरकार घसरतंय… शरद पवारांचं मोठं विधान! )

आत्महत्या कोणीही करु नये

सरकारच्या धोरणाला कंटाळून बिचार्‍या जाधव नावाच्या तरूण शेतकर्‍याने केलेली आत्महत्या दुर्दैवाची असून, याला जबाबदार महावितरण आणि राज्याचे ऊर्जामंत्रीच असल्याचा आरोप राम कुलकर्णी यांनी केला. खरं तर महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ऊर्जामंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. सरकार कितीही शेतकर्‍यांच्या विरोधात भूमिका घेत असले, तरी राज्यातील शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. आत्महत्यासारखे मार्ग कुणीही अवलंब करू नये, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.