जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी लिहिलेल्या वैयक्तिक पत्रांच्या पेट्या सोनिया गांधी यांच्याकडे असल्याचे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा (Nripendra Mishra) यांनी सांगितले. ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना ते म्हणाले की, 16 वर्षांपासून तीन मूर्ती भवन हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान होते. म्हणूनच त्यांची वैयक्तिक आणि अधिकृत पत्रे स्मारकात ठेवण्यात आली होती. या पत्रांमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी भारतातील शेवटचे ब्रिटीश व्हाईसरॉय माउंटबॅटन आणि त्यांच्या पत्नी एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइनस्टाईन, कमला नेहरू, जयप्रकाश नारायण आणि जगजीवन राम यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या नोंदी होत्या, ती सर्व पत्रे नेहरू संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीमध्ये ठेवण्यात आली होती. 2008 मध्ये तत्कालीन संग्रहालयाच्या संचालकांनी नेहरूंच्या पत्रव्यवहाराच्या 51 पेट्या सोनिया गांधींना (Sonia Gandhi) दिल्या होत्या. सोनिया गांधींच्या वतीने जॉर्ज नावाच्या व्यक्तीने ही पत्रे घेण्यासाठी अर्ज केला होता. जॉर्ज यांनी जवाहरलाल नेहरूंची पत्रे वैयक्तिक आणि कार्यालयीन पत्रांमध्ये वेगळी केली होती, अशी महत्वाची माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.
इतिहासकार रिजवान कादरी यांनी पत्रे परत करण्याची केली मागणी
पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे सदस्य असलेले अहमदाबादचे इतिहासकार रिजवान कादरी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांची आई सोनिया गांधी यांना मूळ पत्र परत घेण्याची किंवा त्याची छायाप्रत किंवा डिजिटल प्रत देण्याची मागणी केली आहे. अशीच विनंती यापूर्वी सप्टेंबरमध्ये सोनिया गांधींना करण्यात आली होती, असे प्रथमच नोंदवण्यात आले आहे. 2008 मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीतून जवाहरलाल नेहरूंची कागदपत्रे काढून घेण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी यासाठी जॉर्ज नावाच्या व्यक्तीची नियुक्ती केली होती.
भाजपानेही पत्रे परत करण्याची केली मागणी
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विविध लोकांना लिहिलेली पत्रे सोनिया गांधी यांनी पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाला परत करावीत, अशी मागणी भाजपाचे खासदार संबित महापात्रा यांनी केली. ऐतिहासिक कागदपत्रे ही देशाची संपत्ती आहे, कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. ही पत्रे सार्वजनिक करू नयेत असे प्रथम गांधी कुटुंबाला वाटले. संग्रहालयात डिजिटायझेशनची प्रक्रिया 2010 मध्ये सुरू झाली होती परंतु गांधी कुटुंबाने त्यापूर्वीच ही पत्रे पळवून नेली, असे संबित महापात्रा म्हणाले. (Jawaharlal Nehru)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community