पानिपत पराभवाची नव्हे, मराठ्यांच्या शौर्याची लढाई; CM Devendra Fadnavis यांचे विधान

58
पानिपत पराभवाची नव्हे, मराठ्यांच्या शौर्याची लढाई; CM Devendra Fadnavis यांचे विधान
  • प्रतिनिधी

“पानिपतची लढाई ही मराठ्यांच्या पराभवाची नव्हे, तर शौर्याची लढाई आहे. या ऐतिहासिक लढाईतील त्याग आणि शौर्याची आठवण म्हणून पानिपतच्या काला आंब परिसरात भव्य स्मारक उभारले जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली.

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “पानिपतच्या लढाईत त्या दिवशी पराभव झाल्याचे शल्य मनात असले तरी आम्ही कधीच हा पराभव मानत नाही. या लढाईतूनच उर्जा घेऊन महादजी शिंदेंनी दिल्ली जिंकली आणि छत्रपती शिवरायांचा भगवा देशभर फडकावला. म्हणूनच पानिपतचे स्मारक हे पराभवाचे नव्हे, तर आमच्या शौर्याचे प्रतीक असेल.”

(हेही वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचे आदेश)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेत पानिपतचे स्मारक म्हणजे पराभवाची आठवण होईल, असे म्हटले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) जोरदार प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, “अब्दालीशी मराठ्यांचा थेट संबंध नव्हता. पण दिल्लीचा बादशहा स्वतः मदतीसाठी मराठ्यांकडे आला. मराठ्यांनी दिल्ली जिंकली. त्यावरच अब्दालीने पत्र पाठवून ‘पंजाब, सिंध, बलुचिस्तान माझे, बाकी भारत तुमचा’ असे मान्य करण्याची मागणी केली. पण मराठ्यांनी स्पष्ट उत्तर दिले – एक इंचही जमीन देणार नाही. म्हणूनच पानिपतची लढाई झाली. ही लढाई मराठ्यांनी भारतासाठी लढली. कोणाची मदत नसताना त्यांनी रणभूमी गाजवली.”

(हेही वाचा – Pune Crime : दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भकांचे अवयव; महिला आयोगाच्या ट्वीटनंतर खळबळ)

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, “पानिपत ही गोलाची लढाई होती. दुर्दैवाने मराठ्यांचा गोल फुटला आणि पारडे अब्दालीकडे झुकले. पण लढाई इथे संपली नाही. महादजी शिंदेंनी पुढे दिल्ली पुन्हा जिंकली आणि अब्दालीला पुन्हा या देशात पाऊल ठेवण्याची हिंमत झाली नाही. म्हणून पानिपत आमच्या पराभवाची नव्हे, तर शौर्याची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. मराठे देशासाठी लढले, म्हणून या स्मारकाची उभारणी झालीच पाहिजे.”

सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

सोबतच मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरही आपली भूमिका स्पष्ट केली. “सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील,” अशी ग्वाही त्यांनी दिली. नर्सिंग कॉलेज संदर्भातही त्यांनी स्पष्ट केले की, “एका रूममध्ये नर्सिंग कॉलेज चालवले जात असेल तर चौकशी करून ती बंद करण्यात येतील. मात्र या कॉलेजेसची गरज आहे, त्यात अनियमितता असेल तर कारवाई केली जाईल.” नागपूर दंगलीतील प्यारेखान संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “त्या चादर प्रकरणाशी प्यारेखानचा काहीही संबंध नाही. उलट हिंदू-मुस्लिम एकतेसाठी त्याने प्रयत्न केले, बैठका घेतल्या. याची दखल घेणे गरजेचे आहे.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.