पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे धाकटे बंधू पंकज मोदी (Pankaj Modi) यांनी दि. १ जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी युवा पुरोहित अमित जयप्रकाश देवकुटे (Amit Jayaprakash Devkute ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्र्यंबकेश्वरला भेट देण्याचा निरोप पंकज मोदींना (Pankaj Modi) दिला. नाशिकच्या प्रसिद्ध कैलास मठाचे स्वामी सवितानंद सरस्वती महाराज हे पंकज मोदी यांच्यासोबत उपस्थित होते. (Pankaj Modi)
(हेही वाचा : Earthquake : गुजरातमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के)
ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Jyotirling Mandir) गर्भग्रहात जाऊन पंकज मोदी व स्वामीजींनी अभिषेक केला. पूजा पौरोहित्य जयप्रकाश देवकुटे यांनी केले. तसेच त्र्यंबकेश्वर मध्ये २०२६ मध्ये हे सिंहस्थ कुंभमेळा असल्याने पुन्हा त्र्यंबकेश्वरला येण्याचे पंकज मोदी यांना निमंत्रण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना त्र्यंबकेश्वरला भेट देण्याची विनंती करावी असे सुचवले. मंदिर ट्रस्टच्या वतीने देखील स्वागत करण्यात आले.
यावेळी महंत सत्यप्रकाश ब्रह्मचारी श्रीदेव त्रिपाठी शिवाजी डोळे अरविंदजी हे उपस्थित होते. भाविकांना देखील मोदीच्या बंधूंचे दर्शन घडले. यापूर्वी मोदींचे बंधू सोमाभाई मोदी यांनी काही वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर दर्शन घेतलेले आहे. त्यामुळे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्र्यंबकेश्वरला भेट देतीलच असा विश्वास नववर्षाच्या प्रथम दिनी इथे व्यक्त होत आहे. पंतप्रधानांचे बंधू असून पंकज मोदी (Pankaj Modi) अतिशय साधेपणाने दर्शनाला आल्याचे मंदिरातील पुरोहितांचे म्हणणे आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community