भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने रविवारी, (९ जून) बीडच्या परळी येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला परळीत प्रतिसाद मिळत असून व्यापाऱ्यांसह दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. (Pankaja Munde)
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. याबाबत तीव्र निषेध केला जात आहे. याचा निषेध म्हणून सकल ओबीसी समाज तथा मुंडे समर्थकांकडून हा बंद पुकारण्यात आला असून याबाबतचे निवेदन शनिवारी, (८ जून) परळी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. आजच्या पुकारण्यात आलेल्या बंदला परळी (Parali) शहरातील व्यापाऱ्यांसह दुकानदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Pankaja Munde)
(हेही वाचा – 100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करावे लागेल’, संभाव्य मंत्र्यांना Narendra Modi यांचा मंत्र)
वडवणी शहर बंदचीदेखील हाक
रविवारी परळी शहरातून ओबीसी समाज तथा मुंडे समर्थकांकडून शहरातून रॅली काढण्यात आली. दरम्यान शनिवारी बीडमधील शिरूर कासार येथे ही याच कारणास्तव बंद पुकारण्यात आला होता, तर परळी शहर बंद असून सोमवारी, (१० जून) वडवणी शहर बंदचीदेखील हाक ओबीसी समाजाकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community