विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून Pankaja Munde सह ‘या’ पाच जणांना संधी

Pankaja Munde यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेचे हे आमदार विधान परिषद सदस्यांमार्फत निवडले जाणार आहेत.

129
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून Pankaja Munde सह 'या' पाच जणांना संधी
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून Pankaja Munde सह 'या' पाच जणांना संधी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी या महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह एकूण ५ जणांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.

(हेही वाचा – Mumbai Crime: झोपेत चालणं जीवावर बेतलं; सहाव्या मजल्यावरुन कोसळला आणि मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!)

पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेचे हे आमदार विधान परिषद सदस्यांमार्फत निवडले जाणार आहेत. त्यामध्ये महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपाने पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे.

राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा सोमवारी चौथा दिवस आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. (Pankaja Munde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.