भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंकजा मुंडे यांच्या परळी येथील सहकारी कारखान्यावर सतत कारवाई होत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान तब्बल १९ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने ६ महिन्यांपूर्वी धाड टाकून परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या (Pankaja Munde) कागदपत्रांची तपासणी केली होती. यामध्ये या कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी कर चुकवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता छत्रपती संभाजी नगर येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्यावर कारवाई करत तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
(हेही वाचा – Festivals : सण केवळ धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय झाले पाहिजेत)
छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रीय जीएसटी आयोगाच्या आयुक्त कार्यालयाकडून वैद्यनाथ कारखान्याला (Pankaja Munde) जीएसटी कराबाबत वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिशीला प्रत्युत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी आयोगाने कारखान्यावर धाड टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती. या कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे (Pankaja Munde) बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून १९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community