भाजप नेत्या पंकजा मुंडे ओमायक्रॉन बाधित! कोणत्या आजी-माजी मंत्र्यांना झाली लागण?

माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. याआधी पंकजा मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. त्या घरीच उपचार घेत आहेत.

पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. तेथून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच झाले. या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. विधीमंडळात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच विधान भवन परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या काही पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा कोरोनाचा मंत्र्यांना विळखा! मागील आठवडाभरात किती मंत्र्यांना झाली लागण?)

या आजी-माजी मंत्री, आमदारांना कोरोना

 • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
 • शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
 • आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
 • ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
 • महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
 • खासदार सुप्रिया सुळे
 • आमदार सागर मेघे
 • आमदार राधाकृष्ण विखे पाटील
 • आमदार शेखर निकम
 • आमदार इंद्रनील नाईक
 • आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
 • आमदार माधुरी मिसाळ
 • माजी मंत्री दिपक सावंत
 • माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here