ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी, १५ एप्रिलला मुंबईत येत आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते सह्याद्री अतिथीगृहावर भाजपा नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. मात्र, अमित शहा यांना भेटणाऱ्या नेत्यांच्या यादीतून पंकजा मुंडेंचे नाव वगळण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
शनिवारी सायंकाळी ७ वाजता अमित शहा यांचे मुंबई विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते मुक्कामासाठी सह्याद्री अतिथिगृहावर पोहोचतील. ७.३० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ते विविध नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही शहा यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांचे नाव यादीत नाही.
(हेही वाचा २०२४ पर्यंत महाविकास आघाडी टिकणार का? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले)
अमित शहा यांनीच पंकजा मुंडे यांची भेट नाकारल्याचे भाजपमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटीचे छापे पडल्याने पंकजा चिंतेत आहेत. शिवाय परळीऐवजी पाथर्डी मतदारसंघातून लढण्याची सूचना करण्यात आल्याने त्या नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर त्या शहांना भेटू इच्छितात. मात्र, खुद्द शहा यांनीच भेट नाकारल्यामुळे पंकजा यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.
Join Our WhatsApp Community