२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणूक झाल्या, प्रत्येक वेळी माजीमंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली पण प्रत्यक्ष त्यांना संधी दिली नाही, प्रत्येकवेळी मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. आता त्या भाजप सोडून जाणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती, त्याची घोषणा पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात करतील, अशी दाट शक्यता होती, पण प्रत्यक्ष दसरा मेळाव्यात भाषणात बोलताना पंकजा मुंडे यांनी मी पक्ष सोडून जाणार या चर्चा आता बंद करा. प्रसारमाध्यमांनीही यापुढे कुठल्याही आमदारांची यादी आली तर माझे नाव चालवू नये. मी तुमच्या पाया पडते. मी आता २०२४ च्या तयारीला लागले आहे, असे सांगत पक्षांतराच्या विषयावर पडदा टाकला.
मी नाराज नाही, नाराज व्हायला हे घरगुती भांडण आहे!
मी नाराज नाही. ज्या संस्काराच्या मुशीतून आपल्या देशाचे नेते आले आहेत त्याच संस्कारांच्या मुशीतूनच मी आले आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही तर संघटन श्रेष्ठ आहे, त्यावर माझा विश्वास आहे. मीसुद्धा १७ वर्षे राजकारणात आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होतात. पण मी कुणावर नाराज आहे? कुणावर नाराज होऊ मी? मात्र दसरा मेळाव्याला तुम्ही आला नाही, तर मी नाराज होईन. मी नाराज नाही. नाराज व्हायला हे घरगुती भांडण आहे. राजकारणात मोठमोठ्या लोकांना संघर्ष करावा लागलाय. तुमच्या लेकीच्या वाट्यालाही हा संघर्ष आला. आता संघर्ष करायचा आणि वेळेची वाट पाहायची, असा सूचक सल्लाही पंकजा मुंडे यांनी दिला. ‘माना के औरोके मुकाबले कुछ पाया नही मैने पर खुद को गिराकर कुछ उठाया नही मैने, जरुरत से जादा इमानदार हूँ मै इसलिए सबके नजरोमे गुनाहगार हूँ मै, अशा शब्दात त्यांनी आपली भावना मांडली.
Join Our WhatsApp Community