- खास प्रतिनिधी
‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी जवळीक असल्याने अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आणि त्यांची बहीण, मंत्रिमंडळातील सहकारी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही त्यांना अंतर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरेश धस यांचे विधान
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी बीडमधील भ्रष्टाचार आणि गुंडगिरीबाबत आरोप करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर “विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते. जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे,” असे विधान केले आणि नव्या वादाला तोंड फुटले. (Pankaja Munde)
(हेही वाचा – Arunachal Pradesh मध्ये जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी लागू होणार धर्मस्वातंत्र्य कायदा)
प्राजक्ताची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
प्राजक्ता माळी हिने शनिवारी २८ डिसेंबर २०२४ या दिवशी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, रविवारी २९ डिसेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धस यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. धस यांनी माफी मागावी अशी मागणीही प्राजक्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याशिवाय राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली. (Pankaja Munde)
धस यांच्यावर निशाणा, धनंजयपासून अंतर
प्राजक्ताला भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी पाठींबा दिल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही प्राजक्ताला पाठिंबा दर्शवला. “शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. ‘दुर्दैवी घटना’हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने!! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक.. दुर्दैवाने soft target आहे स्त्री आणि तिचे सत्व..काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे?तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी,” असा संदेश पंकजा यांनी ‘X’ वर पोस्ट केला.
एकीकडे धनंजय यांच्यासोबत पंकजा यांच्यावर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांच्यावर निशाणा साधत पंकजा (Pankaja Munde) यांनी अलगत धनंजय यांना अंतर दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community