भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बुधवारी, 4 सप्टेंबर रोजी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर सडकून टीका केली. आरक्षणाच्या मुद्यावर आमच्या अंगावर मराठा घालता, ओबीसी घालता. पण आता या प्रकरणी फेक नरेटीव्ह चालणार नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, असे मुंडे म्हणाल्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीला जबर फटका बसला. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार नाही याची काळजी भाजपाकडून घेतली जात आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बुधवारी या प्रकरणी सातत्याने महायुती सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला. पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, भाजपाने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण त्यानंतरही या समाजाने लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला नाकारले. कारण, विरोधकांनी फेक नरेटीव्ह पसरवले होते. आता विधानसभा निवडणुकीत हे नरेटीव्ह मोडून काढण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून फेक नरेटीव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीलाच यासंबंधी त्यांची भूमिका विचारली पाहिजे. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला अशी भूमिका या प्रकरणी घेतली पाहिजे.
Join Our WhatsApp Community