वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली.
वैद्यनाथ साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली, यात सर्व संचालक बिनविरोध निवडून आले होते. आज (२० जून) चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी जिल्हा उप निबंधक जाधव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात पंकजा मुंडे यांची पुन्हा चेअरमन पदी सर्वानुमते निवड झाली. व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड झाली.
(हेही वाचा – महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
या बैठकीस संचालक सर्वश्री सतीश मुंडे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, अजय मुंडे, वाल्मिक कराड, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे, राजेश गिते, पांडूरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे, केशव माळी आदी उपस्थित होते.
वैद्यनाथ कारखान्याच्या चेअरमन पदी माझी निवड बिनविरोध झाली..सर्व संचालकांचे आभार…#Gopinathgad येथे जाऊन सर्व संचालकांनी दर्शन घेतले .. pic.twitter.com/DtFRycrFl1
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 19, 2023
पंकजा मुंडेंसह नव नियुक्त संचालकांनी घेतले गोपीनाथ गडाचे दर्शन
पंकजा मुंडे यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल या बैठकीत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी सर्व विजयी संचालकांचेही पुष्पहार घालून स्वागत व अभिनंदन करण्यात आले. बैठकीनंतर पंकजा मुंडे, चंद्रकांत कराड यांचेसह सर्व संचालकांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community