मागील दोन महिन्यांपासून सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहा पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे.
यात्रा दिवसाच्या दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास पंकजा मुंडे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजी नगर मधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होईल. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील देवदर्शनासाठी पंकजा मुंडे दौऱ्यावर जाणार आहेत.
(हेही वाचा – IPC Section 370 : काश्मीरच्या राज्यघटनेपेक्षा भारतीय संविधान श्रेष्ठ ! – केंद्र सरकारच्या भूमिकेशी सर्वोच्च न्यायालय सहमत)
हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी आणि त्यासोबत शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गा मातेच्या दर्शनासाठी असल्याने हा “शिवशक्ती दौरा” असल्याचे सांगितले जात आहे. पण दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे यांचा हा दौरा राजकीय घडामोडी विरहित दौरा विरहित असेल का? असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community