कॉंग्रेसच्या ‘त्या’ माजी आमदाराचा Pankaja Munde यांना पाठिंबा!  

बीडमधील काँग्रेसचे नेते, माजी आमदार नारायण मुंडे यांनी भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, ज्यामुळे आता बीडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

144
कॉंग्रेसच्या ‘त्या’ माजी आमदाराचा Pankaja Munde यांना पाठिंबा!  

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी होणार आहे, त्यामुळेच राज्यात चौथ्या टप्प्यातील प्रचार सभेचा जोर शिगेला पोहोचला आहे. मात्र या प्रचार सभांना अवघे काही तास शिल्लक असताना या प्रचारसभांच्या तोफा मात्र शनिवारी संध्याकाळपर्यंत  थंडावणार आहेत. अशातच बीड (Beed) येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचारासाठी शनिवार सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), भाजपा नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व अन्य काही नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांची मतदारसंघात ताकद वाढली आहे. परिणामी बीडमध्ये एक वेगळं ट्विस्ट समोर आलं आहे. कॉंग्रेसच्या माजी आमदाराने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राजकारणात वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.  (Pankaja Munde)

(हेही वाचा – Salary Negotiation Tips : गुगलच्या माजी एचआर प्रमुखाकडून तरुणांना पगार वाढवण्याच्या टिप्स)

बीड मतदारसंघात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत होणार आहे. मात्र या लढतीमद्धे कॉंग्रेसचे माजी आमदार नारायण मुंडे (Congress Ex MLA Narayan Munde) यांनी पंकजा मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने बीड जिल्ह्यातील गेवराई, बीड, माजलगाव परिसरात पंकजा मुंडे यांची ताकद वाढली आहे. तर ओबीसी समाजाचा आवाज संसद भवनात असावा असं म्हणत पंकजा मुंडे यांना समर्थन करत पाठिंबा दर्शवला आहे. (Pankaja Munde)

(हेही वाचा – ऐन प्रचारसभेत शिवसेनेसह उबाठा गट आमने-सामने; कार्यकर्त्यांचा Chhatrapati Sambhajinagar मध्ये राडा)

नारायण मुंडे यांनी अचानकपणे आपला पाठिंबा जाहीर केल्याने बीडमध्ये महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. तर मुंडेंच्या या निर्णयामुळे ते पक्षावर किंवा महाविकास आघाडीवर नेमके कोणत्या कारणामुळे नाराज आहेत, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पण नारायण मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे पंकजा मुंडे यांची विजयी होण्याची वाट आणखी मोकळी झाली आहे. पण यामुळे मविआचे उमदेवार बजरंग सोनावणे यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. (Pankaja Munde)

हेही पाहा – 

 

              

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.