सर्वांत जास्त पेपरफूट Uddhav Thackeray मुख्यमंत्री असताना झाली; Devendra Fadnavis यांचा घणाघात

या अधिवेशनात आम्ही ज्या परीक्षा घेण्यात आल्या, त्याचा लेखाजोखा मांडणार आहोत. पेपरफूट आणि भरतीत सर्वाधिक घोटाळे त्यांच्या काळात झाले, ते आज बोलतात, असे Devendra Fadnavis यांनी म्हटले आहे.

75
सर्वांत जास्त पेपरफूट Uddhav Thackeray मुख्यमंत्री असताना झाली; Devendra Fadnavis यांचा घणाघात
सर्वांत जास्त पेपरफूट Uddhav Thackeray मुख्यमंत्री असताना झाली; Devendra Fadnavis यांचा घणाघात

सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना झालीपेपरफुटीच्या संदर्भात ते बोलत आहेत, पण सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहे. जवळपास सर्वच परीक्षांमध्ये ही पेपरफूट झाली होती आणि ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. या अधिवेशनात आम्ही ज्या परीक्षा घेण्यात आल्या, त्याचा लेखाजोखा मांडणार आहोत. पेपरफूट आणि भरतीत सर्वाधिक घोटाळे त्यांच्या काळात झाले, ते आज बोलतात, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली.

(हेही वाचा – Ayodhya Rammandir Leakage : राममंदिरात पावसाचे पाणी कसे आले ?; श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने सांगितले सत्य)

या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विरोधकांवर पलटवार केला.

खोटे बोल पण रेटून बोल

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्योग आणि गुंतवणुकीत त्यांच्या काळात तीन ते चार नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात गेल्या २ वर्षांपासून पहिल्या क्रमांकवर आहे. आमची चर्चेची तयारी आहे, सर्वांची उत्तरे देऊ. तुमचे खोटे नरेटिव्ह हाणून पाडू. विरोधी पक्षाने जे पत्र दिले, ते खोटे बोल पण रेटून बोल, असे आहे. त्यांनी आरशात आपला चेहरा पहावा. विदर्भातील एकही प्रकल्पाला ज्यांनी मान्यता दिली नाही, ते आरोप करतात. आम्ही तर सर्व मान्यता आणि निधी दिला. वैधानिक विकास मंडळ त्यांनी बंद केले, ते आम्हाला विचारतात? मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी स्थगिती दिली, ते आम्हाला विचारतात?

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे असूनही सरकार गंभीर नाही. अधिवेशनापूर्वी सरकारने दिलेल्या चहापान निमंत्रणावर बहिष्कार घालत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.