आमदार बनल्यावरही ‘ते’ नगरसेवकपदाचे मानधन घेतात!

आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे हे महापालिकेचे नगरसेवक पदाचे दरमहा 25,000 रुपये मानधन घेतात.

101

मुंबई महापालिकेचे नगरसेवक विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवतात, काही जण जिंकूनही येतात, मात्र त्यानंतर त्यातील अनेक जण दोन्ही पदांवर राहतात, वास्तविक याला प्रतिबंध करणे गरजेचे आहे, परंतु दुर्दैवाने तशी तरतूद नाही, म्हणूनच हे लोकप्रतिनिधी एकाच वेळी आमदार किंवा खासदार असतात आणि नगरसेवक म्हणूनही कायम रहातात. त्याही उपर ही मंडळी नगरसेवक पदाचे मानधनही घेतात. मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी आमदार व खासदार बनल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे, परंतु आमदार बनलेल्या पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे हे नगरसेवक महापालिकेचे मानधन सुद्धा घेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महापालिकेच्या चिटणीस खात्याने दिली आहे.

दरमहा घेतात २५ हजार रुपये मानधन! 

सद्यस्थितीत जे नगरसेवक, आमदार आणि खासदार झाले आहे, त्याची माहिती देताना नाव, वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत नसल्यास त्याची माहिती देण्यात यावी, अशी विचारणा चिटणीस विभागात करण्यात आली. चिटणीस खात्याने याविषयीची माहिती देताना त्यामध्ये खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांना दरमहा 25,000 रुपये मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता 150 रुपये भत्त्यासाठी अशा केवळ चार सभांकरिता दिले जाते, अशी माहिती दिली.

(हेही वाचा : भाजप-मनसे युतीबाबत फडणवीसांचे मोठे विधान! काय म्हणाले वाचा…)

राजकीय पक्षांनी घेतले नाही राजीनामे! 

अनिल गलगली यांच्या मते राजकीय पक्षाने जे नगरसेवक आमदार आणि खासदार बनले आहेत, त्यांनी त्यांचे त्या ठिकाणाचे राजीनामे घेणे आवश्यक होते, पण दुर्दैवाने कुठल्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत कमीत कमी मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.