Param Bir Singh : परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; देवेंद्र फडणवीसांनी घेतला निर्णय

परमबीर सिंह यांच्यावर खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या अनेक प्रकरणांचा सामना करावा लागला होता आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणात कथित अनियमिततेमुळे त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवण्यात आले होते.

186
Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून दिलासा

महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याने अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तसेच डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेशही मागे घेतले आणि निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी असल्याचे मानले जावे, असे आदेशात म्हटले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही अनेक आरोप झाले, ज्यात त्यांचे निलंबन झाले होते.

आदेशात काय म्हटले आहे?

ऑल इंडिया सर्व्हिसेस (शिस्त आणि अपील) नियम, 1969 च्या नियम 8 अंतर्गत परमबीर सिंह, IPS (निवृत्त) यांच्या विरुद्ध 02/12/2021 रोजी जारी केलेले आरोपपत्र मागे घेण्यात आले आहे. हे प्रकरण बंद करण्यात येत आहे. सरकारचे संयुक्त सचिव वेंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यांच्या निलंबनाशी संबंधित अन्य आदेशात म्हटले आहे की, अखिल भारतीय सेवा, नियम 1958 च्या तरतुदीनुसार, परमबीर सिंग IPS (निवृत्त) यांचे निलंबन या आदेशाद्वारे रद्द करण्यात आले आहे आणि 02 डिसेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी हा सर्व उद्देशांसाठी ऑन ड्युटी कालावधी मानला जाईल.

(हेही वाचा …तर १६ आमदार अपात्र ठरले असते; अजित पवारांनी सांगितली मविआची ‘ती’ घोडचूक)

मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हकालपट्टी

परमबीर सिंह यांच्यावर खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या अनेक प्रकरणांचा सामना करावा लागला होता आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणात कथित अनियमिततेमुळे त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवण्यात आले होते. परमबीर सिंह यांच्यावरील या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच स्वतंत्र गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोंदवले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.