ईडीला दिलेल्या जबाबातील विधान मागे घेण्यासाठी सचिन वाझेवर तुरुंगात दबाब टाकला जात असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. हा दबाव अनिल देशमुख यांच्याकडून आणला जात असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांचा दुसरा गौप्यस्फोट
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात तुरुंगात आहे. १६ वर्षे पोलीस खात्यातून दूर असलेला बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला पोलीस खात्यात पुन्हा सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचना दिली होती असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केल्यानंतर सिंग यांनी दुसरा गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझे याच्यावर तुरुंगात दबाव टाकला जात असल्याचे सिंग यांनी ईडीच्या चौकशीत ही माहिती दिल्याचे उघड झाले आहे. अनिल देशमुख यांनी ३० नोव्हेबर २०२१ रोजी चांदीवाल आयोगच्या ठिकाणी सचिन वाझेची भेट घेतली होती, या भेटीच्या दरम्यान त्याने अंमलबजावणी संचालनालयाला दिलेले त्याचे विधान मागे घेण्याची विनंती देशमुख यांनी केली.
(हेही वाचा – कचऱ्याच्या करातून करदात्यांच्या खिशात हात!)
वाझे याची तुरुंगात रोज झडती!
या कारणावरून वाझे याच्यावर तुरुंगात दबाव टाकला जात आहे, वाझे याची तुरुंगात रोज झडती घेतली जात असल्याचे माहिती कळली असे परमबीर सिंग यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे, त्याच बरोबर मला असे देखील कळले की, ठाण्याचे पोलीस उपायुक्त हे वाझे हे मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात असताना त्यानी वाझेची भेट घेतली होती, आणि वाझेवर दबाब आणण्यासाठी देशमुख यांनी चांदीवाल आयोगामध्ये त्याची भेट घेतली होती असे ही सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community