Parliament Attack : संसदेतील घुसखोरी शहरी नक्षलवाद्यांचा कट?

337
भारताच्या नव्या संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. बुधवारी, १३ डिसेंबर रोजी अचानक दोन तरुण लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून त्यांनी धुराचे नळकांडे फोडले. त्याच वेळी संसदेच्या आवारात दोघे जण सरकारच्या विरोधात निषेध करत होते. Parliament Attack प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले, त्यातील हरियाणातील नीलम ही अर्बन नक्षलवाद्यांचा पाठिंबा मिळालेल्या शेतकरी आंदोलनाची कार्यकर्ती आहे, हीच नीलम सीएए आणि एनआरसीच्या आंदोलनातही सहभागी होती, तर दुसरा आरोपी महाराष्ट्रातील अमोल शिंदे याला ऍड. असीम सरोदे यांनी कायदेशीर मदत करण्याची घोषणा केली आहे. हा सर्व प्रकार पाहता या हल्ल्यात अटक केलेले आरोपी शहरी नक्षलवादी होते का? हा हल्ला शहरी नक्षलवाद्यांचाच कट होता का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

नीलमला अमोल शिंदेची साथ

संसदेत घुसखोरीच्या (Parliament Attack) प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींची धरपकड सुरु केली. यात एकूण सहा आरोपी आहेत, त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि दोघांचा शोध सुरु आहे. जेव्हा पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची चौकशी केली, यात आरोपी डी. मनोरंजन, सागर शर्मा यांनी सभागृहात धुडघूस घातला, तर संसदेच्या बाहेर नीलम आणि अमोल शिंदे यांनी धुडघूस घातला. यामध्ये नीलम ही शेतकरी आंदोलन, सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभागी होती. या दोन्ही आंदोलनांना शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा होता. याच नीलम बरोबर अमोल शिंदे हा संसदेच्या आवारात धुडघूस घालत होता. त्यामुळे नीलम आणि अमोल शिंदे यांची शहरी नक्षलवादी पार्श्वभूमी आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
देशभरात अर्बन नक्षलवादी युवकांची माथी भडकावून त्यांच्या डोक्यात जी विद्रोही बीजे भरत आहेत, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, संसदेत युवकांनी केलेली घुसखोरी! जगभरात याला चौथ्या स्तराचे युद्ध म्हटले आहे. यात विद्यार्थ्यांना क्रांतीच्या नावे ब्रेनवॉशिंग करून त्यांना अन्यायाच्या विरोधात लढण्याचा मुलामा देऊन देशाच्या व्यवस्थेच्या विरोधात उभे केले जाते. यातूनच ही मुले पुढे हातात AK-47 घेऊन नक्षलवादी बनतात आणि हिंसक मार्ग आचरणात आणतात. असीम सरोदे यांच्या सारख्या स्वतः ला संविधानाचे तज्ञ म्हणवणाऱ्यांनी या आंदोलनजीवी मुलाचे वकीलपत्र घेण्यात अर्बन नक्षलवादी लिंक दिसून येते. यात त्या युवकांना भगतसिंग यांच्याशी जोडण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. भगतसिंग यांनी केलेली क्रांती विदेशी ब्रिटिश सरकारच्या विरोधात होती. आज येथे युवकांना सर्व मार्ग उपलब्ध असताना जगभरात आपल्या सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेची नाचक्की करण्यात, आणि देशाच्या शत्रूंना मार्ग दाखवण्याला कोणती क्रांती म्हणता येईल.

– रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदू जनजागृती समिती

अमोल शिंदेला ऍड. असीम सरोदे यांची मदत  

2001 ला झालेल्या संसद हल्ल्याची आठवण करून देणाऱ्या या घटनेत अटक करण्यात आलेल्या अमोल शिंदेला अॅड. असीम सरोदे कायदेशीर मदत करणार आहेत. तशी त्यांनी पोस्ट केली आहे. अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून (Parliament Attack) बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल, असे असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.