Cash For Query Case : खासदार महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द

महुआ मोईत्रा यांची हकालपट्टी करण्यासाठी सभागृहात मतदान होताच विरोधकांनी बहिष्कार टाकला.

290
Cash for Query Case : महुआ मोईत्रा यांनी बंगला रिकामा केला
Cash for Query Case : महुआ मोईत्रा यांनी बंगला रिकामा केला

तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना शुक्रवार, ०८ डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष यांनी कॅश फॉर क्वेरी प्रकरणात (Cash For Query Case) निलंबित केले. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात (Cash For Query Case) सहभागी असलेल्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. नैतिक समितीच्या अहवालानंतर त्यांच्या हकालपट्टीचा प्रस्तावही मांडण्यात आला होता. यानंतर मतदान झाले. मात्र, महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची हकालपट्टी करण्यासाठी सभागृहात मतदान होताच विरोधकांनी बहिष्कार टाकला. (Cash For Query Case)

चर्चेदरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी नैतिकता समितीच्या शिफारशीवरून महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना सभागृहात बोलू दिले नाही. पॅनलच्या बैठकीत बोलण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले होते. संसदेच्या नैतिकता समितीने शुक्रवारी संसदेत महुआंविरोधात (Mahua Moitra) अहवाल सादर केला होता. त्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षात जोरदार खडाजंगी चर्चा झाली. मात्र चर्चे नंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी त्यांचे निलंबन जाहीर केले. (Cash For Query Case)

नैतिकता समितीच्या अहवालात महुआंचे (Mahua Moitra) संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात आली असून कायदेशीर चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र समितीने दिलेल्या अहवालाचे वाचन करण्यासाठी विरोधी सदस्यांनी वेळ मागितला होता. तेव्हा दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना वेळ देण्यात आला होता. दरम्यान टीएमसीने ५०० पानांचा अहवाल वाचण्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्याची मागणी केली होती, ती लोकसभा अध्यक्षांनी नाकारली. तसेच सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले आणि अवघ्या ४ मिनिटांनी लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. (Cash For Query Case)

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: ‘इस्रायलवर हल्ला केलात तर…’; बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिली हिज्बुलाहला धमकी)

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर नैतिक समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार विजय सोनकर यांनी अहवाल सादर केला. यानंतर सभागृहात गदारोळाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी या मुद्द्यावरून लोकसभेत तीनदा गदारोळ झाला. दोन वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी २ वाजल्यापासून तिसर्‍यांदा कारवाईला सुरुवात झाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी अहवालावर चर्चा करण्यासाठी अर्धा तास दिला होता. यानंतर विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी आपले म्हणणे मांडले. (Cash For Query Case)

टीएमसीच्या खासदारांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सभागृहात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. यानंतर झालेल्या कामकाजात अहवालावर चर्चा झाली. त्यानंतर महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना निलंबित केले. लोकसभेत या विषयावर चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर मतदान झाले. गुरुवारी भाजपने आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी ३ ओळींचा व्हीप जारी केला होता, जेणेकरून मतदानादरम्यान खासदारांचे संख्याबळ पूर्ण राहील. (Cash For Query Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.