संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ तारखेदरम्यान होणार अधिवेशन

274
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; 'या' तारखेदरम्यान होणार अधिवेशन

संसदेच्या नवीन इमारतीमधील प्रथम अधिवेशन जुलै महिन्यात होणार आहे. देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी संसदेची नवीन इमारत सज्ज आहे. यामुळे यावेळच्या पावसाळी अधीवेशनाची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनापासून संसदेच्या या इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणारे २० हून अधिक पक्ष प्रथमच येथे पाऊल ठेवणार आहेत, हे विशेष.

(हेही वाचा – Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा?)

पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांनी विधीमंडळ कामकाजात सहभाग घ्यावा आणि विविध विषयांवर चर्चा करावी, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीटद्वारे केलं आहे. २३ दिवस चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात एकूण १७ बैठका होतील, असंही ते म्हणाले आहेत.

नव्या संसद भवनातील हे पहिलेच अधिवेशन

यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची खास गोष्ट म्हणजे नवीन संसद भवनात होणारं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. नवं संसद भवन पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ मे रोजी नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन केलं होतं. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टने या नवीन संसद भवनाच्या इमारतीचं बांधकाम केलं आहे. दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या इमारतीत प्रत्येक मंत्र्याला वेगळं कार्यालय मिळणार आहे. आधीच्या संसद भवन इमारतीत केवळ ३० कॅबिनेट मंत्र्यांना आणि काही राज्यमंत्र्यांना कार्यालय मिळाले होते. याशिवाय नवीन संसद भवनात प्रत्येक पक्षाला वेगळं कार्यालय दिलं जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.