Parliament New Building : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी नव्या संसदेवर फडकणार झेंडा

गज गेटसमोर "राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाची" तयारी सुरू केली

161
Parliament New Building : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी नव्या संसदेवर फडकणार झेंडा
Parliament New Building : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी नव्या संसदेवर फडकणार झेंडा

संसदेचे विशेष अधिवेशन पाच दिवसांनी सुरु होणार आहे. मात्र हे संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच नवीन संसद भवनावर (Parliament New Building)औपचारिकपणे तिरंगा फडकवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याचदिवशी विश्वकर्मा पूजा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे.त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची चर्चा होत आहे.

१८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणारे विशेष अधिवेशन जुन्या इमारतीत सुरू होणार आहे. त्यानंतर संसद भवनाचे पुढील कामकाज नवीन संसदेत होईल. २८ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या संसदेत होणारे हे पहिले अधिवेशन असेल.
मंगळवारी नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक संबोधन प्रणाली भाड्याने घेण्यासाठी निविदा जारी करून तीन औपचारिक प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या गज गेटसमोर “राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाची” तयारी सुरू केली. यासंबंधीत दोन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन इमारतीत अशाप्रकारे पहिल्यांदाच ध्वजारोहण होणार आहे.

(हेही वाचा : Maratha Reservation: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगे पाटील यांची भेट घेणार)

या विशेष अधिवेशनाबाबत अनेक घडामोडी घडत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोडही लागू केला जाणार आहे. लोकसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आत आणि बाहेरील कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.