Parliament Session : पीक विमा नेमका कुणासाठी? ओमराजे निंबाळकर यांचा सवाल

142
Parliament Session : पीक विमा नेमका कुणासाठी? ओमराजे निंबाळकर यांचा सवाल

सरकारकडून पीक विमा योजना नेमकी कुणासाठी राबविली जाते? शेतकऱ्यांसाठी की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी? असा थेट प्रश्न उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोमवारी (२२ जुलै) शून्य प्रहरात सरकारला विचारला. विमा कंपन्यांच्या मनमानीची माहिती देताना ते म्हणाले की, विमा कंपन्याकडून भरपाई देताना मोठी टाळाटाळ केली जाते. सरकारने विमा कंपन्यांना ३३ हजार ६० कोटी रूपयाचा प्रिमिअम जमा केला होता. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे पीकांचे खूप नुकसान झाले. परंतु, या कंपन्यांनी केवळ २३ हजार ८७४ कोटी रूपयाचा क्लेम मंजूर केला. ९ हजार १८६ कोटी रूपयांचा या कंपन्यांना थेट फायदा झाला. जेव्हा की, पीके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. सरकारकडून एका हेक्टरचा पीक विमा उतरविण्यासाठी १८ हजार रूपये प्रिमिअमपोटी कंपन्यांना दिले जाते. हेच पैसे थेट शेतकऱ्यांना दिले तर शेतकऱ्याला जास्त बरे होईल, असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले. (Parliament Session)

(हेही वाचा – Jal Jeevan Mission च्या कामांची केंद्रीय टास्क फोर्सकडून समीक्षा; अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर)

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – गायकवाड

मराठी भाषा दोन हजार वर्षे जुनी असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी उत्तर-मध्य मुंबईहून कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. यावेळी त्यांनी कविवर्य सुरेश भट यांची ‘लाभले आम्हास भाग्य बोलता मराठी’ ही कविता सभागृहात वाचून दाखविली. हजारो वर्षे जुने ग्रंथ आणि साहित्य मराठी भाषेत आहे. या भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एवढेच नव्हे तर, पठारे समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. परंतु, याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. यामुळे सरकारने या विषयात तातडीने लक्ष घालून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली. (Parliament Session)

मुंबईत दुसरा रनवेचे काम सुरू करा – वाईकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी सांताक्रुझमधील दुसऱ्या रनवेचे काम सुरू करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, दुसरा रनवे बंद असल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. (Parliament Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.