राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषानावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चे दरम्यान इंडी आघाडीच्या नेत्यांनी लोकशाहीच्या मंदिरात गोंधळ घातल्यामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना सभागृहाचे कामकाज सोमवार (१ जुलै) पर्यंत तहकुब करावे लागले. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी काल, गुरुवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. राष्ट्रपतींच्या या अभिभाषणानंतर शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार होती. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात ही चर्चा होणार होती. (Parliament Session)
मात्र, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सभागृहात नीटच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली. धन्यवाद प्रस्तावावर बोलताना हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो अशी सूचना बिर्ला यांनी केली. परंतु, इंडी आघाडीच्या नेत्यांनी हा सल्ला धुडकावून लावला. नीटच्या मुद्यावर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्यामुळे लोकसभाध्यक्षणा लोकसभेचे कामकाज सोमवार, १ जुलैपर्यंत तहकुब करावे लागले. (Parliament Session)
(हेही वाचा – Budget Session 2024: पुणे अपघात प्रकरणावरुन विरोधक आक्रमक; फडणवीसांनी विधिमंडळात दिली धक्कादायक माहिती!)
दुसरीकडे, राज्यसभेत भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू करताच एनडीएचे सहयोगी आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. देवेगौडा यांनी राज्यसभेत नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आम्हाला सामूहिक जबाबदारी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. माजी पंतप्रधानांनी हात जोडून सभागृहाला विनंती केली. मात्र गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज थोड्या वेळासाठी तहकुब करावे लागले. (Parliament Session)
दुपारी १२ वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू झाले. पण विरोधकांनी पुन्हा नीटचा मुद्दा रेटून लावला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला आणि या विषयावर विरोधी खासदारांशी चर्चा करण्याची मागणी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर आधी चर्चा करावी असा आग्रह धरला. राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला विरोधी पक्ष आणि सरकारकडून भारतातील विद्यार्थ्यांना संयुक्त संदेश द्यायचा होता की आम्ही हा महत्त्वाचा मुद्दा मानतो. त्यामुळे, आम्ही विचार केला की विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ, आम्ही आज नीटवर चर्चा करू. राहुल म्हणाले की, येथे दोन शक्ती आहेत, एक ज्यांना चर्चा हवी आहे आणि दुसऱ्याला नाही. (Parliament Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community