Parliament winter session 2023 : सलग दुसऱ्या दिवशी खासदारांचे निलंबन, सुप्रिया सुळेंसह ४९ खासदार निलंबित

सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेतून ४९ खासदार निलंबित झाले आहेत. दोन दिवसांत एकूण १४१ खासदारांचं निलंबन झालं आहे. सुप्रिया सुळेंसह ४९ खासदार निलंबित झाले आहेत.

270
MP Suspension : खासदार निलंबनाच्या विरोधात २२ ला देशव्यापी आंदोलन
MP Suspension : खासदार निलंबनाच्या विरोधात २२ ला देशव्यापी आंदोलन

संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून सध्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये (Parliament winter session 2023) गोंधळ सुरु आहे. या गोंधळामुळे अयोग्य वर्तनाचा ठपका ठेवत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल म्हणजेच १८ डिसेंबर रोजी ३१ खासदारांना निलंबित केलं होतं. त्यानंतर आज म्हणजेच मंगळवार १९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊद जिवंत आणि ठणठणीत, छोटा शकीलचा दावा)

सुप्रिया सुळेंसह ४९ खासदार निलंबित

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर, मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह ४९ खासदारांना मंगळवारी सभागृहाचे कामकाज विस्कळीत केल्याबद्दल निलंबित (Parliament winter session 2023) करण्यात आले. यासह, संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे, ज्यात लोकसभेचे ९५ आणि राज्यसभेचे ४६ खासदार आहेत.

(हेही वाचा – Neelam Gorhe : संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत)

याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज (Parliament winter session 2023) आणि राज्यसभेचे कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधी खासदारांनी आपले निलंबन आणि संसदेच्या सुरक्षा उल्लंघनाबाबत आंदोलन सुरू ठेवले होते. त्यांनी फलक दाखवून ‘पीएम सदन में आओ’ आणि ‘गृह मंत्री इस्तिफा दो’ अशा घोषणा दिल्या.

(हेही वाचा – Former Governor Raghuram Rajan: …तर भारत श्रीमंत होण्याआधीच म्हातारा देश होईल, आरबीआयचे माजी गव्हर्नर यांचे विधान)

या खासदारांचे झाले निलंबन

लोकसभेतील ज्या खासदारांना निलंबित (Parliament winter session 2023) करण्यात आले त्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश अहे. याशिवाय, व्ही वेंथिलिंगम, गुरजित सिंग औजला, सप्तगिरी उलाका, अदूर प्रकाश, अब्दुल समद समदानी, मनीष तिवारी, प्रद्युत बोरदोलोई, गिरधारी यादव, गीता कोडा, फ्रान्सिस्को सरदिन्हा, जगत रक्षम, एसआर पार्थिवन, फारूक अब्दुल्ला, ए गणेश मुर्ती, ए. माला राय, वेलुसामी, ए चंदकुमार, शशी थरूर, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, हसनैन मसूदी, दानिश अली, खादीदुल रहमान, राजीव रंजन सिंग, डीएनव्ही सेंथिल कुमार, संतोष कुमार, ड्युअल चंद्र गोस्वामी, रवनीत बिट्टू, डी. , के सुधाकरन, मोहम्मद सादिक, एमके विष्णू प्रसाद, पीपी मोहम्मद फैजल, सजदा अहमद, जसवीर सिंग गिल, महाबली सिंग, सुशील कुमार रिंकू, सुनील कुमार सिंग, एचटी हसन, एम धनुष कुमार, प्रतिभा सिंग, थोल थोलमावलम, चंद्रेश्वर प्रसाद, आलोक कुमार सुमन, दिलेश्वर कामत या खासदारांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Gyanvapi Masjid Case : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का)

लोकसभेच्या (Parliament winter session 2023) कामकाजाला आज (१९ डिसेंबर) सकाळी ११ वाजता सुरवात झाल्यनंतर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत विरोधी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने संमत झाला. यानंतर पीठासीन अधिकारी यांनी ४९ खासदारांना निलंबित केले जात असल्याचे सांगितले.

विरोधक आपलाच शब्द पाळत नाहीत –

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “सभागृहात फलक दाखविले जाणार नाही. वेलमध्ये येवून घोषणाबाजी केली जाणार नाही असा निर्णय एकमताने सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता. परंतु, विरोधक (Parliament winter session 2023) आपलाच शब्द पाळत नसल्याचा आरोप मेघवाल यांनी केला. तीन राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे विरोधी पक्ष हताश झाला आहे. यामुळे सभागृहात गोंधळ घालत आहेत,” असेही ते म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.